आपल्याला काही होणार नाही असं समजून बाहेर पडू नका. पोलीस देखील एक माणूसच आहे. त्यांच्यावर किती ताण द्यायचा. घराबाहेर पडणाऱ्या किती लोकांना पोलीस थांबवणार? आपण स्वत: शिस्त पाळून सरकारला सहकार्य करावं, अशी विनंती मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे. त्यांनी राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला.

कृपया या दिवसांमध्ये कोणीही घराबाहेर पडू नये. जेव्हा एखादा लोकप्रतिनिधीही बाहेर पडतो त्याच्यासोबत अनेक लोक बाहेर फिरतात. त्यांच्यासोबत असलेल्यांपैकी कोण पॉझिटिव्ह आहे हे सांगता येणार नाही. त्यामुळे आपणच खबरदारी घ्यायला हवी आणि घरातच थांबायला हवं असा सल्ला पाटील यांनी दिला. आपल्याला काही होणार नाही असं समजून कोणीही घराबाहेर बाहेर पडू नका. बाहेर पडलेल्या किती जणांना पोलीस थांबावणार. पोलीस देखील एक माणूस आहे. त्यामुळे आपणच घराबाहेर न पडणं योग्य आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

आणखी वाचा- सांगलीत करोना व्हायसरची चाचणी करणारी लॅब का नाही? जयंत पाटलांनी दिलं हे उत्तर

बाहेर असलेल्यांनी ज्या ठिकाणी आहेत सध्या ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी राहावं. शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आमची चर्चा झाली. शेतीविषयक काय उपाययोजना करता येतील यावर आम्ही संवाद साधला. शेतीची कामं बंद होऊ नये असं आम्ही ठरवलं आहे. आम्ही काल पेट्रोल पंप चालकांशीही संवाद साधला असून शेतकऱ्यांना पेट्रोल, डिझेल देण्याचे निर्देश दिले आहेत आहेत. शेतकऱ्यांची कोणतीही कामं अडता कामा नये असंही सांगितलं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी बाजार समिती आम्ही सुरू केली. परंतु बाजार समितीतही लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. लोकं त्या ठिकाणी गर्दी का करत आहेत हे समजत नाही. लोकांनी आपल्याला शिस्त लावून घेतली पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- Blog: एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचं मुंबईकरांसाठी पत्र

इस्लामपूर परिसर सील
इस्लामपुरात मोठ्या प्रमाणात करोनाचे रुग्ण आढळले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून इस्लामपुर परिसर सील करण्यात आल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.

शिवभोजनाची संख्या वाढवली
करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गोरगरीब जनता उपाशी राहू नये यासाठी आम्ही शिवभोजनाची संख्या वाढवली आहे. संख्या वाढवण्यासोबतच त्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. याव्यतिरिक्त काही ठिकाणी सोशल डिस्टंस ठेवण्यासाठी बाजारांमध्ये चौकोन आखून देण्यात आसे आहेत. गर्दी होऊ नये यासाठी आम्ही काम करत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.