News Flash

MLC Polls : काँग्रेसतर्फे राजेश राठोड आणि राजकिशोर मोदी यांना उमेदवारी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ही घोषणा केली आहे

विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने राजेश राठोड आणि राजकिशोर मोदी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी याबाबतची घोषणा केली. काँग्रेसने या दोघांना उमेदवारी दिल्याने विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे.

संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे पाच तर भाजपाचे चार उमेदवार निवडून येतील असा दावा केला जात असताना, काँग्रेसने आता सहाव्या जागेवरही दावा सांगितला आहे. त्यामुळे आता निवडणुकीत शिवसेना दोन, राष्ट्रवादी दोन आणि काँग्रेस दोन जागा लढणार आहेत.

दरम्यान दिग्गज नेत्यांना डावलून भाजपाने विधान परिषद निवडणुकीसाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. डॉक्टर अजित गोपचडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे.

नऊ रिक्त जागांसाठी निवडणूक, कोणत्या पक्षाचे उमेदवार कोण?
उद्धव ठाकरे-शिवसेना
नीलम गोऱ्हे-शिवसेना
राजेश राठोड-काँग्रेस
राजकिशोर मोदी-काँग्रेस
रणजितसिंह मोहिते पाटील-भाजपा
गोपीचंद पडळकर-भाजपा
प्रवीण दटके- भाजपा
डॉ. अजित गोपचडे-भाजपा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 9:46 pm

Web Title: maharashtra mlc election congress announce two candidates names for polls scj 81
Next Stories
1 गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
2 महाराष्ट्रात ११६५ नवे करोना रुग्ण, ४८ मृत्यू, संख्या २० हजार २०० च्या वर
3 नाशिक जिल्ह्यात करोनाबाधित पोलिसाचा मृत्यू
Just Now!
X