राज्यात आता करोना व्हायरसची साथ बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. महाराष्ट्रात आज ३,१४५ नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद झाली. त्याचवेळी ३,५०० करोना बाधित रुग्ण बरे झाले. बाधा होणाऱ्यांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. राज्यात आज करोनामुळे ४५ जणांचा मृत्यू झाला.

राज्यात आतापर्यंत करोनामुळे ५०,३३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 18,81,088 रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. राज्यात एकूण ५२,१५२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७८ टक्के आहे.

पुण्यात एकाच दिवसात 261 रुग्ण आढळले, तर 3 जणांचा मृत्यू
पुणे शहरात दिवसभरात 261 करोना बाधित रुग्ण आढळले. तीन रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत पुण्यात 1 लाख 82 हजार 709 जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्याच दरम्यान 240 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 1 लाख 75 हजार 394 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.