27 January 2021

News Flash

२६/११ हल्ल्याचे साक्षीदार श्रीवर्धनकर यांच्यासाठी धावून आले फडणवीस, केली आर्थिक मदतीची घोषणा

कल्याणधील रुग्णालयात जाऊन घेतली भेट

मुंबईत २६/११ हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. पाकिस्तानातून आलेल्या १० अतिरेक्यांनी शहरात धुमाकूळ घातला. लष्कराच्या मदतीने काही दिवसांमध्येच परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं होतं. तर मुंबई पोलिसांनी या हल्ल्यातील एक अतिरेकी अजमल कसाबला जिवंत पकडण्यात यश मिळवलं. अजमल कसाबची ओळख पटवणाऱ्या हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांना काही दिवसांपूर्वी आपलं राहतं घर सोडावं लागलं होतं. मुंबईतील सात रस्ता भागात ते फुटपाथवर झोपलेले एका दुकानदाराला दिसले.

सात रस्ता भागात दुकान असलेल्या डीन डिसुजा यांनी आपल्या NGO मध्ये काम करणाऱ्या मित्राच्या सहाय्याने श्रीवर्धनकर यांची सोय केली. कल्याणला राहत असलेल्या श्रीवर्धनकर यांना पोलिसांच्या सहाय्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणमधील आयुष हॉस्पिटलमध्ये जाऊन श्रीवर्धनकर यांची भेट घेतली. यावेळी फडणवीस यांनी श्रीवर्धनकर यांच्या कुटुंबाशी संवाद साधला, तसेच श्रीवर्धनकर यांच्या उपचाराचा सर्व खर्च भाजप पक्ष करेल अशी घोषणाही फडणवीस यांनी केली. याचसोबत पक्षातर्फे श्रीवर्धनकर कुटुंबाला १० लाखांचा निधीही देण्यात येईल असं फडणवीस यांनी जाहीर केलं.

२६/११ च्या हल्ल्यात श्रीवर्धनकर जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. श्रीवर्धनकर हे अजमल कसाबला ओळखणार्‍या मुख्य साक्षीदारांपैकी एक होते. कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईल यांनी कामा हॉस्पिटलच्या बाहेर गोळीबार सुरू केला तेव्हा हरिश्चंद्र यांना गोळीही लागली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2020 6:49 pm

Web Title: maharashtra opposition leader devendra fadanvis help 2611 her shrivardhankar who was laying on mumbai footpath few days ago psd 91
Next Stories
1 नाशिक : आमोदे फाटा चेक पोस्टवरील पोलिसांवर गावगुंडाचा हल्ला
2 Lockdown: शेकडो मैल दूर असलेल्या डॉक्टर आईच्या कार्याला चिमुकलीचा सलाम
3 Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात रुग्ण संख्येने 600 चा टप्पा ओलांडला, 61 नवे पॉझिटिव्ह
Just Now!
X