X
X

पहिल्या नंबरवर महाराष्ट्र की गुजरात, मोदींनी जाहीर करावं – नवाब मलिक

READ IN APP

मोदींनी महाराष्ट्र की गुजरात एक नंबरवर आहे हे देशातील जनतेसमोर जाहीर करावे

गुजरात सर्वच क्षेत्रात एक नंबरवर आहे असे मोदी बोलत असतील आणि आज महाराष्ट्र एक नंबरवर असल्याचे फडणवीस बोलत असतील तर मोदींनी महाराष्ट्र की गुजरात एक नंबरवर आहे हे देशातील जनतेसमोर जाहीर करावे असे थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोदींना दिले आहे.

सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र एक नंबरला असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर केले आहे. त्याचा समाचार घेताना नवाब मलिक यांनी हे आव्हान दिले आहे.

याअगोदर नरेंद्र मोदी गुजरात हे देशात सर्वच क्षेत्रात एक नंबरवर आहे आणि आजही गुजरात एक नंबरवर आहे असे बोलत होते असेही नवाब मलिक म्हणाले.

20

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Just Now!
X