18 July 2019

News Flash

नागपुरात कारमधून 80 लाखांची रोकड जप्त

रामटेक भागात ही कारवाई करण्यात आली आहे

संग्रहित छायाचित्र

नागपुरातल्या रामटेक भागात एका कारमधून 80 लाखांची रोकड पोलिसांनी पकडली आहे. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता पैशांचं वाटप मोठ्या प्रमाणावर होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे असे पैसे घेऊन जाणाऱ्या कार किंवा इतर वाहनांवर पोलिसांची करडी नजर असते.

यासंदर्भातच ही कारवाई करण्यात आली असावी असा अंदाज व्यक्त होतो आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. कार कुणाची आहे? या प्रकरणी कुणाला अटक करण्यात आली आहे का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

First Published on March 15, 2019 10:14 pm

Web Title: maharashtra police recovered rs 80 lakh in cash from a car in nagpur districts ramtek today