News Flash

“सुशांतचे ‘ते’ फोटो तुमच्या मोबाइलमध्ये असतील तर…”; महाराष्ट्र पोलिसांचा इशारा

पोलिसांनी ट्विटरवरुन युझर्सला दिला इशारा

प्रातिनिधिक फोटो

हिंदी चित्रपट सृष्टीमधील अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृतदेहाचे फोटो सोशल नेटवर्किंगवर शेअर करु नयेत असा इशारा महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने दिला आहे. सुशांतने रविवारी (१४ जून) मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तो ३४ वर्षांचा होता. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत त्याने करिअरला सुरुवात केली होती. २०१३ मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुशांतने आत्महत्या का केली यामागील कारण अद्याप समजू शकलेलं नसून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. आत्महत्येनंतर सुशांतच्या घरातील काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये सुशांतचा मृतदेह दिसत आहे. मात्र आता याच फोटोंवरुन महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने इशारा दिला आहे.

सुशांतच्या मृतदेहाचे फोटो शेअर करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. इतकच नाही तर याआधी लोकांनी फोटो शेअर केले असतील तर ते डिलीट करावे असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे. सायबर सेलच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन या फोटोंसंदर्भातील इशारा पोलिसांनी दिला आहे. या संदर्भात पोलिसांनी तीन ट्विट केले आहेत.

नक्की वाचा >> “आमचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही, केंद्रीय संस्थांकडून सुशांतच्या आत्महत्येचा तपास करा”

“सोशल मिडियावर एक धक्कादायक ट्रेण्ड महाराष्ट्रामधील सायबर सेलला सध्या दिसून येत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतरचे फोटो सर्क्युलेट केले जात आहेत. हे फोटो धक्कादायक आणि शेअर करण्यासारखे नाहीत. अशाप्रकारचे फोटो शेअर करणे कायद्याच्या नियमांप्रमाणे गुन्हा आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार अशाप्रकारच्या कृतीसाठी कायदेशीर करावाई केली जावू शकते. महाराष्ट्र सायबर सेल सर्वांना अशाप्रकारचे फोटो सर्क्युलेट करु नये असं आवाहन करत आहे. जर असे फोटो शेअर केले असतील तर ते डिलीट करावेत,” असं पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मे महिन्यामध्येच काही वादग्रस्त, अश्लील, मानहानीकारक पोस्ट शेअर केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने कलम १४९ सीआरपीसी अंतर्गत काही युझर्सला नोटीस पाठवली होती. दिग्दर्शिका फरहान खाननेही ट्विटवरुन या व्हायर फोटोंसंदर्भात आपला संताप व्यक्त केला होता. माझा मित्र सुशांत खूप कमी वयात आम्हाला सोडून गेला. त्याच्या निधनाचे फोटो शेअर करणं बंद करा. ही मनोरंजनाची गोष्ट नाही, अशा आशयाचे तिने ट्विट केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 8:21 am

Web Title: maharashtra police warns of legal action for circulating photos of sushant singh rajputs body scsg 91
Next Stories
1 ‘मी बरा आहे …अन्नत्याग, नवस-पायी वाऱ्या करु नका’, धनंजय मुंडेंचं समर्थकांना आवाहन
2 बागायतदारांना आणखी मदत देण्याचा विचार
3 वादळाने आदिवासी कुटुंबांची फरफट
Just Now!
X