News Flash

“अजित पवारांनी तोंड सांभाळून बोलावं; मी फाटक्या तोंडाचा… बोललो तर महागात पडेल”

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानांवरून अजित पवारांनी दिलं होतं उत्तर... अजित पवारांनी केलेल्या विधानांवर चंद्रकांत पाटलांनी दिला गर्भित इशारा

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानांवरून अजित पवारांनी दिलं होतं उत्तर. (छायाचित्र संग्रहित। पीटीआय)

‘सगळे झोपेत असताना सरकार जाईल. कळणारच नाही कधी गेलं,’ असं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेबद्दल बोलताना केलं होतं. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी त्यांच्या शैलीतून उत्तरं दिलं. अजित पवारांनी दिलेल्या उत्तरानंतर संताप अनावर झालेल्या पाटलांनी पवारांना गर्भित इशाराच दिला. “ज्या भाजपासोबत आपण तीन दिवसांचे सरकार स्थापन केले होते आणि ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो होतो, त्यांच्याविषयी काय बोलतोय, याचे भान अजित पवार यांनी बाळगावे,” असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर प्रहार केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत येऊन दोन वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने रविवारी (३० मे) कोल्हापूर येथे करोना योद्ध्यांच्या सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या भूमिकेबद्दल मत व्यक्त केलं.

“अजित पवार यांनी भाजपावर टीका करताना तोंड सांभाळून बोलावे, नाहीतर आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत. आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल. झोपेत असताना सरकार कसं आणायचं, हे अजित पवार यांना चांगलेच ठाऊक आहे. तुम्ही शरद पवार झोपेत असताना सरकार स्थापन करुन मोकळे झाला होतात. मात्र, अजित पवार यांना आपण काल काय केलं होतं, ही गोष्ट लक्षात राहत नाही,” असा टोला पाटील यांनी अजित पवारांना लगावला.

“महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पडेल,” चंद्रकांत पाटलांचं खळबळजनक विधान

“अजित पवारांना कुणीही तलवारीचा धाक दाखवून शपथविधीसाठी नेलेलं नव्हतं. त्यामुळे आपण ज्या भाजपासोबत तीन दिवसांचे सरकार स्थापन केले होते आणि ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो होतो, त्यांच्याविषयी काय बोलतोय, याचे भान त्यांनी बाळगायला हवे. तुम्हाला राष्ट्रवादीचे २८ आमदार तुमच्यासोबत ठेवता आले नाहीत. ते शरद पवारांकडे पुन्हा पळून गेले. हा अजित पवार यांचा दोष आहे. अजित पवार यांना सगळीकडेच राहायचे असते. जिथे सरकार तिथे मी असलेच पाहिजे, अशी अजित पवारांची प्रवृत्ती आहे,” अशी टीका पाटील यांनी केली.

“….तर अजित पवार आणि शरद पवारांच्या मागे पहिला शिपाई म्हणून मी उभा असेन”; चंद्रकांत पाटलांनी दिला शब्द

“मराठा आरक्षणाच्या विषयासंदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या सर्व मागण्यांना भाजपाचा पाठिंबा आहे. पण केवळ करोना काळात रस्त्यावर उतरून संघर्ष नको, ही संभाजीराजेंची भूमिका आम्हाला मान्य नाही. राज्यात सगळं सुरळीत सुरु आहे. त्यामुळे करोना काळात रस्त्यावर उतरून संघर्ष नको. शांत बसा, हे आम्हाला मान्य नाही. संभाजीराजे रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असतील, तर भाजपा त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढेल, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मांडली.

जीएसटी परिषदेतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागणीची दखल; केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून मंत्रिगट स्थापन

चंद्रकांत पाटलांनी कोणत्या विधानामुळे दिला इशारा?

‘महाराष्ट्र झोपेत असताना सरकार जाईल. कळणारच नाही कधी गेलं,’ असं पाटील म्हणाले होते. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्युत्तर दिलं होतं. “सरकार जाणार, हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी जागे असताना केलं की, झोपेत केलं होतं? ज्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार आलं, तेव्हापासून भाजपा नेत्यांना असह्य झालंय. त्यांना आपण सरकारमध्ये नाही हे सतत बोचत असतं. कार्यकर्त्यांनी सोबत रहावं यासाठी काही ना काही बोलत राहतात. जोपर्यंत तिन्ही पक्षाचे नेते निर्णय घेत नाहीत तोपर्यंत सरकार राहणार,” असं अजित पवार म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 12:20 pm

Web Title: maharashtra politics ajit pawar vs chandrakant patil chandrakant patil warned ajit pawar thackeray sarkar bmh 90
Next Stories
1 “….तर अजित पवार आणि शरद पवारांच्या मागे पहिला शिपाई म्हणून मी उभा असेन”; चंद्रकांत पाटलांनी दिला शब्द
2 काँग्रेसचं सरकार असताना झालेल्या पुण्याईमुळेच देशाचा कारभार सुरु आहे – संजय राऊत
3 … त्या बदनामीच्या ‘टुलकिट’चे सूत्रधार कोण होते?; संजय राऊतांचा सवाल
Just Now!
X