News Flash

माझं आणि फडणवीसांचं भांडण, पण…; महादेव जानकर यांचा राजकीय गौप्यस्फोट

पडळकरांवरही साधला निशाणा

संग्रहित छायाचित्र

शरद पवार यांच्या भेट घेतल्यापासून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. जानकर भाजपाच्या नेतृत्वाखालील युतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, त्याचं त्यांनी खंडण केलं. त्यानंतर जानकर यांनी फडणवीसांसोबत भांडण असल्याचं सांगत राजकीय गौप्यस्फोट केला आहे. आज बारामतीत एका कार्यक्रमासाठी आलेल्या जानकरांनी माध्यमांशी बोलताना मनातील खदखद जाहीरपणे मांडली आहे.

महादेव जानकर आज एका कार्यक्रमासाठी बारामतीत होते. त्यावेळी त्यांना माध्यमांशी संवाद साधला. “माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं भांडण सुरु आहे. पण त्याचा फायदा आम्ही दुसऱ्याला होऊ देणार नाही. त्यामुळे आपण एनडीएमध्येच राहणार आहे,” असं जानकर म्हणाले.

आणखी वाचा- महादेव जानकरांनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अलिकडेच भेट घेतली होती. त्या भेटीवरून राजकीय वर्तुळात जानकर भाजपाची साथ सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण या चर्चांना त्यांनी स्वतः फेटाळून लावल्या होत्या. गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या कारखान्याच्या कामासंदर्भात ही भेट होती, असं जानकरांनी स्पष्ट केलं होतं. “भाजपावर आपण नाराज असलो, तरी कुठेही जाणार नाही. आपण सध्या एनडीएमध्येच आहोत आणि पुढेही एनडीएमध्येच राहणार. एखाद्या पक्षाचा पडता काळ असल्यावर आपण पळून जायचं नसतं,” असं जानकर म्हणाले.

आणखी वाचा- ८० वर्षाच्या शरद पवारांची सत्ताधारी पक्षाला भीती वाटते- धनंजय मुंडे

धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्न सुरुच असल्याचं जानकरांनी सांगितलं. जानकरांना डावलून भाजपानं गोपीचंद पडळकर यांना जवळ केल्यानं जानकर नाराज असल्याचीही चर्चा आहे. त्यावर बोलताना जानकर म्हणाले,”माझा जिल्हाध्यक्ष जेवढा प्रबळ आहे, तेवढा तो नाही.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2020 3:04 pm

Web Title: maharashtra politics bjp ndd mahadev jankar on devendra fadnavis gopichand padalkar bmh 90
Next Stories
1 “चिकनचं आमिष दाखवून रक्तदान शिबीर भरवणं म्हणजे…”
2 शरद पवारांच्या नावाने ठाकरे सरकार लागू करणार योजना; मंत्रिमंडळ बैठकीत घेणार निर्णय
3 बलात्कार करणाऱ्याचा २१ दिवसांत फैसला, ठाकरे सरकार करणार कायदा
Just Now!
X