News Flash

एक नोटीस आली अन् पक्ष हादरला…- राम कदम

भाजपा नेत्याने घेतला शिवसेना, संजय राऊतांचा समाचार

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ‘ईडी’ने नोटीस बजावल्यापासून मोदी सरकार आणि भाजपा विरोधात शिवसेनेने टीकेचा सूर लावला आहे. मागील दोन दिवसांपासून संजय राऊत भाजपाला लक्ष्य करताना दिसत असताना ‘सामना’च्या अग्रलेखातूनही शिवसेनेने भाजपावर टीकास्त्र सोडलं. त्यानंतर, भाजपा नेत्यांनी शिवसेना व संजय राऊतांवर जोरदार टीका केली. भाजपाचे आशिष शेलार, केशव उपाध्ये, किरीट सोमय्या, अतुल भातखळकर यांच्यानंतर राम कदम यांनी शिवसेनेचा समाचार घेतला.

शिवसेनेनं अमिताभचा आणलेला आव कायम ठेवावा- भाजपा

“स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत ‘सामना’मध्ये लिहित होते तोपर्यंत ते एक वर्तमानपत्र होतं. आता मात्र ते केवळ एका पक्षाची जाहिरात करण्यासाठी सुरू असलेलं हॅण्डबिल आहे. सामनामध्ये हल्ली राम मंदिराबरोबरच बाबरी मशीदचाही उल्लेख होतो. राम मंदिराचा निर्णय लवकर लागू नये म्हणून ज्या काँग्रेस पक्षाने वकिलांची फौज उभारली, त्याच हिंदुत्वविरोधी काँग्रेससोबत शिवसेना सत्तेत आहे. ही दुटप्पी भूमिका कशी चालेल? ‘ईडी’कडून केवळ एक नोटीस आली आणि पक्ष हादरला, पक्ष घाबरला”, अशा शब्दात राम कदम यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांचा समाचार घेतला.

“…मग म्हणतच बसावं लागेल ‘मै नंगा हू”; संजय राऊतांना टोला

“नोटीशीला घाबरायचं काय कारण? कर नाही त्याला डर कशाला? आणि जर काही कारणाने घाबरले असाल तर याचा अर्थ नक्कीच काही तरी गौडबंगाल आहे. कुठेतरी पाणी मुरतंय हे समजायला महाराष्ट्राची जनता निश्चितपणे हुशार आहे”, असा टोलाही त्यांनी लगावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 1:55 pm

Web Title: maharashtra politics ed sanjay raut bjp leader ram kadam angry slams shivsena uddhav thackeray over notice politics see video vjb 91
Next Stories
1 ‘सीबीआय’ला रोखलं म्हणून आता ‘ईडी’चा वापर- गृहमंत्री अनिल देशमुख
2 महाराष्ट्रात ३१ जानेवारीपर्यंत निर्बंध कायम; ठाकरे सरकारचा निर्णय
3 शिवसेनेनं अमिताभचा आणलेला आव कायम ठेवावा- भाजपा
Just Now!
X