News Flash

“सत्ता विश्वासघाताने मिळवता येते पण..”;भाजपाचा सेनेला टोला

"सरकार पाडणारची टेप बंद करा"

संग्रहित (PTI)

शिवसेना-भाजपात ईडीच्या नोटीशीवरून राजकारण रंगलं आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या नोटीशीवरून भाजपाला धारेवर धरलं आहे. भाजपाकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असून, त्यामुळे दबाव आणला जात असल्याचा आरोप, संजय राऊत यांनी केला होता. त्याला भाजपाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर पलटवार केला आहे. “सत्ता विश्वासघाताने मिळवता येते, पण चालवायला क्षमता लागते. क्षमता नसली ती सरकार पाडणार, सरकार पाडणार, सरकार पाडणार अशी टेप सारखी लावली जाते. सत्तेवर आहात तर जनहिताची कामे करा. गोरगरिबांना पॅकेज नाही. शेतकऱ्यांना मदत नाही. सरकार पाडणारची टेप बंद करून या प्रश्नांवर काही कृती करा,” असा टोला उपाध्ये यांनी लगावला आहे.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस मिळाल्यानंतर शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर गंभीर आरोप केले होते. भाजपाकडून सरकार पाडण्यासाठी दबाब आणला गेल्याचं राऊत यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील २२ आमदारांनाही धमकावलं जात असल्याचा दावा राऊत यांनी केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 4:01 pm

Web Title: maharashtra politics keshav upadhye bjp shivsena bjp ed notice politics bmh 90
Next Stories
1 एकनाथ खडसे पुन्हा करोना पॉझिटिव्ह?
2 ‘थर्टीफर्स्ट’चं प्लॅनिंग करताय? आधी गृहमंत्र्यांनी दिलेल्या सूचना वाचाच
3 एक नोटीस आली अन् पक्ष हादरला…- राम कदम
Just Now!
X