24 January 2021

News Flash

खरं तर केसच उगवू देणार नव्हतो; रावसाहेब दानवेंचा सत्तारांना टोला

मराठा आरक्षण : "याचा अर्थ हे सरकार कमी पडलं"

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व राज्यमंत्री अब्दुल सत्तार. (संग्रहित छायाचित्र)

‘केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पराभूत केल्याशिवाय डोक्यावरील टोपी काढणार नाही,’ असा निर्धार करत शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट दानवे यांना आव्हान दिलं. सत्तार यांच्या या निर्धारावरून रावसाहेब दानवे यांनी मिश्किल टोला लगावला आहे. सत्तार हे माझे चांगले मित्र आहेत. बिचारे बोलतात, पण निवडणूक आली की, माझंच काम करतात, असा चिमटा दानवे यांनी अब्दुल सत्तार यांना काढला आहे.

भाजपा महिला मोर्चा प्रदेश कार्यकारणीचा मेळावा लोणावळ्यात पार पडला. या मेळाव्याला रावसाहेब दानवे उपस्थित होते. कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानाचाही समाचार घेतला. दानवे म्हणाले,”अब्दुल सत्तर यांचं पहिलं वक्तव्य होत की, रावसाहेब दानवे पडल्याशिवाय डोक्यात केस उगवू देणार नाही. आता पण केलाय टोपी घालणार नाही. अब्दुल सत्तार हे माझे चांगले मित्र आहेत. बिचारे बोलतात, पण निवडणूक आली, तर माझंच काम करतात. ते आमचे मित्र आहेत. त्यांची टोपी काढणार नाही. कधीच निघू देणार नाही! खरं तर केसच उगवू देणार नव्हतो,” असा टोला दानवे यांनी सत्तारांना लगावला.

मराठा आरक्षण : “याचा अर्थ हे सरकार कमी पडलं”

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, “मराठा आरक्षणाचा विषय या सरकार ने क्लिष्ट करून टाकला आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं होत तर मागासवर्गीय आयोगाची स्थापना करायला हवी होती. त्यावेळी नारायण राणे समिती स्थापन केली त्यांनी आरक्षण दिलं. या सरकारला माहीत होतं की मागासवर्गीय आयोग नेमल्या शिवाय आरक्षण देता येत नाही. हे आरक्षण टिकत नाही, विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आरक्षण दिलं होत. ते त्यांना टिकवता आला नाही. आमचं सरकार आल्यानंतर आरक्षण दिलं आणि ते टिकवलं. आता हे टिकवण्याची जबाबदारी या सरकारची होती. आमचं स्पष्ट मत आहे, सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं सरकार तामिळनाडूला स्टे देत नाही. महाराष्ट्राला स्टे देत, याचा अर्थ वकिलाची फौज उभी करण्यात हे सरकार कमी पडल आहे,” असं म्हणत दानवे यांनी सरकारवर ठपका ठेवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2021 3:10 pm

Web Title: maharashtra politics maratha reservation raosaheb danve abdul sattar shivsena bmh 90 kjp 91
Next Stories
1 त्यांचा काय उद्देश आहे, मला माहिती नाही; दानवेंनी ठाकरे सरकारच्या निर्णयावर उपस्थित केली शंका
2 भंडारा दुर्घटना : मुख्यमंत्री ठाकरेंची जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट
3 भंडारा प्रकरण: “कोणाकोणाचा आवाज दाबणार आहात?”; भाजपाचा ठाकरे सरकारला सवाल
Just Now!
X