News Flash

…मग विरोधी पक्षात का आहात?; नाना पटोलेंचा भाजपावर पलटवार

"काँग्रेस पक्षात स्वतंत्र निर्णय घेता येतो, पण भाजपामध्ये मोदी, शाह यांना विचारावं लागतं"

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. (संग्रहित छायाचित्र)

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महाराष्ट्र भाजपा यांच्यात ट्विटरवर जुंपली आहे. इटलीहून आलेल्या आदेशांचं पालन करणाऱ्यांनी बदनामीचा बाजा वाजवू नये, असं म्हणत भाजपाने नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला होता. भाजपाच्या ट्विटनंतर नाना पटोले यांनी पलटवार केला. “काँग्रेस पक्षात स्वतंत्र निर्णय घेता येतो, पण भाजपामध्ये मोदी, शाह यांना विचारावं लागतं,” असं सांगत पटोलेंनी भाजपाला सवाल केला आहे.

“दिल्लीच्या इशाऱ्यांवर गल्लीत शेपूट हलवणाऱ्या नेत्यांनी भाजपाला ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नये. भाजपा हा जनतेचा पक्ष आहे. काँग्रेसच्या गांधी परिवाराप्रमाणे घराणेशाही भाजपात चालत नाही,” असं म्हणत भाजपाने नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. भाजपाकडून करण्यात आलेल्या टीकेला नाना पटोलेंनी ट्विट करून उत्तर दिलं.

“दिल्लीच्या इशारावर कोण चालतो हे जनतेला ठाऊक आहे. काँग्रेस पक्षात स्वतंत्र निर्णय घेता येतो, परंतु भाजपामध्ये मोदी, शाह यांना विचारावं लागते. भाजपा हा जनतेचा पक्ष आहे, तर विरोधी पक्षात का? कॉंग्रेसमध्ये लोकशाही आहे, हिटलरशाही नाही. सुशांत सिंह प्रकरणाच्या चौकशीचं काय झालं, जनतेला कळू द्या,” असं म्हणत पटोले यांनी भाजपा प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपाकडून पोस्टर…उचलली जीभ लावली टाळ्याला

तुमच्या महाभकास आघाडी सरकारने मुंबई आणि महाराष्ट्राची परिस्थिती काय करून ठेवली, हे राज्याच्या सामान्य जनतेलाच ठाऊक आहे. इटलीहून आलेल्या आदेशांचं पालन करणाऱ्यांनी बदनामीचा बाजा वाजवू नये. राज्याच्या हितासाठी काय योग्य-अयोग्य हे भाजपाला ठाऊक आहे… कारण हा भारतीय ‘जनता’ पक्ष आहे,” असं भाजपानं म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 5:00 pm

Web Title: maharashtra politics nana patole attack maharashtra bjp chandrakant patil and devendra fadnavis bmh 90
Next Stories
1 अब्जावधी रुपयांच्या फसवणुकीचा प्रयत्न; भाजपा चित्रपट आघाडीच्या रोहन मंकणीला अटक
2 आता दिवसाकाठी तीन लाखांच्या गतीने लसीकरण करण्याचा निर्धार – राजेश टोपे
3 मुख्यमंत्री ठाकरेंनी बैठकीत मोदींना काय सांगितलं?; टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती
Just Now!
X