राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजपा आणि शिवसेनेचा ‘सामना’ रंगताना दिसत आहे. भाजपाकडून होत असलेल्या आरोपांना शिवसेनेच्या नेत्यांसह सामनातूनही प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं दिसत आहे. सामनातील लिखाणाबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप नोंदवला असून, त्याबद्दल संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचं सांगितलं. पाटील यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी भुवया उंचावत आश्चर्य व्यक्त केलं.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सामनातून होणाऱ्या लिखाणाबद्दल आक्षेप नोंदवला होता. सामनातून गलिच्छ भाषा वापरली जाते. याबद्दल आपण संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचं पाटील म्हणाले होते. त्याबद्दल माध्यमांच्या प्रतिनिधींना राऊत यांना प्रश्न केला.

kannada producer Soundarya Jagadish found dead
घरात मृतावस्थेत आढळले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबविरोधात दाखल झाला होता गुन्हा
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
Review of Rohini Nilekanis book Shambharital Shahanapan on durgabai Nilekani
शंभरीतलं शहाणपण!

यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले,”अरे बापरे… ताबडतोब… लगेच. मला आता त्यांची भीती वाटतेय… ते पत्र लिहतायेत.. वा वा. सामना वाचतात. सामना वाचायला लागले चांगली गोष्ट आहे. कालपर्यंत वाचत नव्हते. आता सामना वाचत राहिले, तर त्यांच्या जीवनात भरपूर बदल होतील. सकारात्मक नजरेतून महाराष्ट्र आणि देशाकडे बघतील. सामना वाचत राहिले, तर त्यांचा विश्वास बसेल की, पुढच्या पाच वर्षांपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार राहणार आहे,” असा टोला राऊत यांनी लगावला.

‘सामना’तील लिखाण आक्षेपार्ह, रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार -चंद्रकांत पाटील

औरंगाबाद महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे नामांतराचा मुद्दा ऐरणीवर येताना दिसत आहे. या मुद्यावरून भाजपाकडून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहे. या औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले,”औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं. त्याला तीस वर्ष झाली आहेत. आता फक्त कागदावर बदलायचं आहे. महाविकास आघाडीत हा मतभेदाचा विषय नाही. एकत्र बसले, तर मुद्दा निकाली निघेल,” असं राऊत यांनी सांगितलं.