राज्यातील करोना संसर्ग अद्याप सुरूच असून आज करोनाबाधित रूग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. कालच्या दिवसभरात राज्यात १ हजार ८४२ नवे कोरनाबाधित रुग्ण आढळले आले होते. आज मात्र ही संख्या २४ तासांत २ हजार २०४ वर पोहोचली आहे. करोनामुळे राज्यात ४७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या २० लाख १३ हजार ३५३ वर पोहोचली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात ४३ हजार ८११ सक्रिय रूग्ण आहेत. तर, आतापर्यंत ५० हजार ८६२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे. दिवसभरात महाराष्ट्रात २ हजार १०६ जणांनी करोनावर मात केली आहे. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.२४ टक्के इतके झाले आहे. आतापर्यंत राज्यात १९ लाख १७ हजार ४५० जणांनी करोनावर मात केली आहे.

पुण्यात दिवसभरात २२५ नवे रुग्ण

पुणे शहरात दिवसभरात २२५ करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण करोनाबाधितांची संख्या १ लाख ८५ हजार ००५ इतकी झाली आहे. दिवसभरात तिघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा एकूण आकडादेखील ४ हजार ७४२ इतका झाला आहे. पुण्यात आतापर्यंत एकूण १ लाख ७८ हजार २७४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra pune pimpri chinchwad coronavirus updates dated 26 january 2021 medical bulletin svk 88 kjp vjb
First published on: 26-01-2021 at 20:33 IST