News Flash

महाराष्ट्रात ५ हजार ३६८ नवे रुग्ण, २०४ मृत्यू

मागील २४ तासांमध्ये ३ हजारांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज

महाराष्ट्रात ५ हजार ३६८ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २०४ मृत्यूंची नोंद मागील चोवीस तासांमध्ये झाली आहे. आज आलेल्या संख्येनंतर महाराष्ट्रातील करोना रुग्णांची एकूण संख्या २ लाख ११ हजार ९८७ इतकी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये ३ हजार ५५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १५ हजार २६२ इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ५४.३७ इतका झाला आहे.

सध्या राज्यात ६ लाख १५ हजार २६५ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४६ हजार ३५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. आत्तापर्यंत पाठवण्यात आलेल्या ११ लाख ३५ हजार ४४७ नमुन्यांपैकी २ लाख ११ हजार ९८७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात सध्याच्या घडीला ८७ हजार ६८१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आज राज्यात ५३६८ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या २ लाख ११ हजार ९८७ इतकी झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 7:58 pm

Web Title: maharashtra recorded 5368 new covid 19 cases and 204 deaths in the last 24 hours scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 कोल्हापूर : १ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना लिपकास रंगेहात पकडले
2 पाच हजार प्रयोगशील शेतकऱ्यांची माहिती आता ‘रिसोर्स बँक’ द्वारे उपलब्ध
3 महाबीजचे बियाणे सदोष असेल, तर त्यांच्यावर देखील कारवाई करा : कृषीमंत्री भुसे
Just Now!
X