News Flash

राज्यात करोना बाधित रुग्णांचा उच्चांक; दोन हजार रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तीन दिवसांपासून पाच हजारांची भर...

करोनाचा शिरकाव झाल्यापासून राज्यात एका दिवसात पहिल्यादांच बाधित झालेल्या रुग्णांची उच्चांकी नोंद झाली. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात पाच हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असून आज उच्चांकी नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना बाधित रूग्णांचा आकडा १ लाख ६४ हजार ६२६ इतका झाला आहे. तर दोन हजार ३३० रुग्णांना दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून आकडेवारी जाहीर केली.

राज्यात मागील तीन दिवसांपासून पाच हजारांपेक्षा जास्त संख्येनं करोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून येत आहेत. त्यात आज (२८ जून) नव्या उच्चांकाची नोंद झाली आहे. राज्यात आज ५,४९३ करोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १ लाख ६४ हजार ६२६ इतकी झाली आहे. आज नवीन २ हजार ३३० करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण ८६ हजार ५७५ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी परतले आहेत. राज्यात सध्या एकूण ७० हजार ६०७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

तीन दिवसांपासून पाच हजारांची भर…

राज्यातील करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या आकडेवारीवरून ती दिसून येत आहे. राज्यात २६ जून रोजी ५ हजार २४ रुग्ण आढळून आले. एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ होती. मात्र, त्यानंतर सलग दोन दिवसांपासून संख्येत आणखी वाढ झाली आहे. २७ जून रोजी राज्यात ५ हजार ३१८ रूग्ण आढळून आले होते. त्यानंतर आज साडेपाच हजारांच्या जवळपास रुग्ण आढळून आले आहेत. ही एका दिवसात आढळून आलेल्या रुग्णांची राज्यातील आतापर्यंतची उच्चांकी संख्या आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 8:15 pm

Web Title: maharashtra records 5493 new covid 19 cases bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “कोणाच्या धमकीला घाबरत नाही”; चंद्रकांत पाटलांचं हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर
2 विठूरायाचं नामस्मरण अन् पूजा घरातूनच करा; सरकारचं भाविकांना आवाहन
3 रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड
Just Now!
X