24 September 2020

News Flash

राज्यातील करोना रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा उंचावला; दिवसभरात मोठी वाढ

राज्याचा एकूण आकडा १ लाख ८० हजारांच्या पलीकडे

रुग्णसंख्येच्या बाबतीत राज्यासाठी कालचा दिवस काहीसा दिलासादायक ठरल्यानंतर आज पुन्हा चिंता वाढवली आहे. एका दिवसात आढळून आलेल्या रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा वर गेला आहे. राज्यात पाच हजारांहून अधिक रुग्णांची नव्यानं भर पडली. त्यामुळे एकूण आकडा १ लाख ८० हजार २९८ इतका झाला आहे. तर दिवसभरात २ हजार २४३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिवसभरातील करोना आकडेवारीची माहिती दिली. टोपे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. “राज्यात आज ५ हजार ५३७ करोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. आज नवीन २ हजार २४३ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ९३ हजार १५४ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण ७९ हजार ७५ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत,” अशी माहिती टोपे यांनी दिली.

एक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा वाढ

राज्यात गेल्या काही दिवसांपासून संसर्गग्रस्त रुग्णांची आकडेवारी वाढली आहे. २७, २८, २९ जून रोजी राज्यात पाच हजारांहून अधिक संख्येनं करोना बाधित रुग्ण आढळून आले होते. काल (३० जून) त्यात घट झाल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे काहीसा दिलासा राज्याच्या आरोग्य विभागाला मिळाला होता. मात्र, आज (१ जुलै) रुग्णसंख्या पुन्हा पूर्वपदावर जाऊन पोहोचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 9:29 pm

Web Title: maharashtra records 5537 covid 19 cases as tally crosses 1 8 lakh bmh 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 ताडोबा व्याघ्र पर्यटनाला टाळेबंदीचा फटका; पहिल्या दिवशी तुरळक पर्यटकांचा प्रतिसाद
2 करोनाबाधितांसाठी खासगी रुग्णवाहिका, वाहने ताब्यात घेणार; राज्य शासनाचा निर्णय
3 अकोल्यात करोना मृत्यू व रुग्णवाढीचे सत्र कायम
Just Now!
X