६,७२७ नवे रुग्ण, १०१ जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासात करोनाचे ६,७२७ नवे रुग्ण आढळले असून, १०१ जणांचा मृत्यू झाला. रविवारी चाचण्यांची संख्या कमी असल्याने रुग्णसंख्येतही घट झाली. प्रतिदिन अडीच ते तीन लाख चाचण्या राज्यात केल्या जातात. रविवारी दोन लाखांच्या आसपास चाचण्या झाल्या. त्यात ६,७२७ नवे रुग्ण आढळले. शनिवारी ९,९७४ रुग्णांची नोंद झाली होती. दिवसभरात रायगड ३९९, पुणे जिल्हा ३७५, पुणे शहर १६२, पिंपरी-चिंचवड १७८, सातारा ४७९, कोल्हापूर १३०४, सांगली ७३७, सिंधुदुर्ग ३४६, रत्नागिरी ३६३ नवे रुग्ण आढळले. राज्यात सध्या १ लाख १७ रुग्ण उपचाराधीन आहेत.

मुंबईत आणखी ६०८ रुग्ण, १८ जणांचा मृत्यू

मुंबईत सोमवारी ६०८ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर १८ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण बाधितांची संख्या सात लाख २० हजारांपुढे गेली आहे. तर मृतांची एकू ण संख्या १५ हजार ४१४ झाली आहे. एका दिवसात ७१४ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत सहा लाख ९४ हजारांहून अधिक म्हणजेच ९६ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. उपचाराधीन रुग्णांची संख्या ८,४५३ झाली आहे.

रविवारी २८ हजार २९५ चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी सुमारे अडीच टक्के  नागरिक बाधित आढळले. मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.०९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधीही ७२८ दिवस आहे.

ठाणे जिल्ह्य़ात ३७५ बाधित

ठाणे जिल्ह्य़ात सोमवारी ३७५ करोना रुग्ण आढळून आले. तर १६ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्य़ात आढळून आलेल्या बाधितांपैकी ठाणे ९६, नवी मुंबई ९२, कल्याण-डोंबिवली ६०, मिरा भाईंदर ४९, ठाणे ४१, बदलापूर १४, उल्हासनगर १३, अंबरनाथ सात आणि भिवंडीत तीन रुग्ण आढळून आले.

मृतांपैकी नवी मुंबईत चार, उल्हासनगर तीन, मिरा भाईंदर दोन, ठाणे ग्रामीण दोन, अंबरनाथ दोन तर ठाणे, भिवंडी आणि बदलापुरातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला.