News Flash

महाराष्ट्रात २१ हजार ६५६ नवे करोना रुग्ण, ४०५ नवे रुग्ण

महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये २२ हजारांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्रात २१ हजार ६५६ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ४०५ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात २२ हजार ०७८ रुग्णांना मागील २४ तासांमध्ये डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची आत्तापर्यंतची संख्या ११ लाख ६७ हजार ४९६ इतकी झाली आहे. यापैकी ८ लाख ३४ हजार ४३२ रुग्णांना करोनामुक्त झाले आहेत. तर करोनाची लागण होऊन महाराष्ट्रात आत्तापर्यंत ३१ हजार ७९१ मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला ३ लाख ८८७ अॅक्टिव्ह केसेस आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात आज ४०५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७२ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५६ लाख ९३ हजार ३४५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११ लाख ६७ हजार ४९६ नमुने पॉझटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७ लाख ७८ हजार ७९२ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३६ हजार ७६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज ३ लाख ८८७ अॅक्टिव्ह केसेस आहेत.

आज जे ४०५ मृत्यूंची नोंद झाली आणि पोर्टलवर अद्ययावत झालेले ३५ मृत्यू असे एकूण ४४० मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. ४४० मृत्यूंपैकी २४४ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर १०३ मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. अशीही माहिती आरोग्य विभागाने त्यांच्या पत्रकात दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 8:36 pm

Web Title: maharashtra reported 21656 new coronavirus cases 22078 recoveries and 405 deaths today scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “युती केली हेच चुकलं! नाहीतर विधानसभा निवडणुकीत १५० जागांच्या पुढे गेलो असतो”
2 ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना करोनाची बाधा
3 सरकारने पोलीस भरतीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा; संभाजीराजे यांची सरकारला सूचना
Just Now!
X