महाराष्ट्रात मागील चोवीस तासात ४ हजार १५३ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. १ कोटी २ लाख ८१ हजार ५४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी एकूण १७ लाख ८४ हजार ३६१ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर मागील चोवीस तासांमध्ये ३० रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मागील चोवीस तासात ३ हजार ७२९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण १६ लाख ५४ हजार ७९३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील करोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९२.७४ टक्के इतका झाला आहे.

महाराष्ट्रात आज घडीला ५ लाख १७ हजार ७११ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ६ हजार २५४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. तर आज घडीला महाराष्ट्रात ८१ हजार ९०२ अॅक्टिव्ह केसेस आहेत अशीही माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे. ४ हजार १५३ नवे करोना रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रातील करोना ग्रस्तांची एकूण संख्या १७ लाख ८४ हजार ३६१ इतकी झाली आहे.