महाराष्ट्रात ७ हजार ७४ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २४ तासांमध्ये २९५ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्येने २ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंतच्या करोना रुग्णांची संख्या २ लाख ६४ झाली आहे. यापैकी ८३ हजार २९५ अॅक्टिव्ह केसेस आहेत.दरम्यान आज राज्यात ३३९५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ८ हजार ८२ इतकी झाली आहे.

राज्यात मागील २४ तासांमध्ये २९५ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी १२४ मृत्यू मागील ४८ तासांमधले आहेत. तर उर्वरित १७१ मृत्यू हे मागील कालावधीतले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.३३ टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत १० लाख ८० हजार ९७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २ लाख ६४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ९६ हजार ३८ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर ४१ हजार ५६६ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात सध्या ८३ हजार २९५ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

प्रमुख शहरांमधली अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या
मुंबई- २४ हजार ३९६
ठाणे- २६ हजार ७२७
पुणे- १३ हजार ५१
नाशिक-१८९०
नवी मुंबई-३०९७

मागील २४ तासांमध्ये महाराष्ट्रात ३३९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ८ हजार ८२ इतकी झाली आहे. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ५४.०२ टक्के इतका झाला आहे.