27 February 2021

News Flash

Good News! महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण ११ लाखांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज

मागील २४ तासांमध्ये १२ हजारांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्रात मागील २४ तासात १२ हजार ९८२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ११ लाख ६२ हजार ५८५ इतकी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये १० हजार २४४ करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यातील करोनाग्रस्तांची आत्तापर्यंतची संख्या १४ लाख ५३ हजार ६५३ इतकी झाली आहे. तर मागील २४ तासांमध्ये २६३ जणांचा मृत्यू करोनामुळे झाल्याची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत राज्यात ३८ हजार ३४७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रातील करोना रुग्ण बरे होण्याचा दर अर्थात रिकव्हरी रेट हा ८० टक्के झाला आहे. आत्तापर्यंत ७१ लाख ६९ हजार ८८७ पाठवण्यात आलेल्या प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४ लाख ५३ हजार ६५३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला २२ लाख १६० लोक हे होम क्वारंटाइन आहेत. तर २६ हजार ७४९ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.

राज्यात सध्याच्या घडीला २ लाख ५२ हजार २७७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात १० हजार २५४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १४ लाख ५३ हजार ६५३ इतकी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये २६३ मृत्यूंची नोंद झाली आहे त्यातले १३३ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर ५८ मृत्यू मागील आठवड्यातले आहे. तर उर्वरित ७२ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत, अशीही माहितीही महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2020 8:40 pm

Web Title: maharashtra reports 10244 new covid 19 cases 263 deaths and 12982 discharges today scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 वर्धा : करोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसाच्या कुटुंबास ५० लाखांचा धनादेश
2 ….तर समृद्धी महामार्गाचे काम बंद पाडणार – आमदार भोयर
3 राष्ट्रवादीनं ‘एलजीबीटी’ सेलची केली स्थापना, प्रिया पाटील राज्यप्रमुख
Just Now!
X