महाराष्ट्रात करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी जास्त असल्याचं समोर आलं आहे. मागील २४ तासांमध्ये १२ हजार ९५८ नवे करोना रुग्ण राज्यात आढळले आहेत. तर १७ हजार १४१ रुग्णांना मागील २४ तासांमध्ये डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मागील २४ तासांमध्ये ३७० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या आता १४ लाख ६५ हजार ९११ इतकी झाली आहे. तर महाराष्ट्रात आत्तापर्यंत करोनाची बाधा होऊन ३८ हजार ७१७ मृत्यू झाले आहेत. आत्तापर्यंत ११ लाख ७९ हजा ७२६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात सध्याच्या घडीला २ लाख ४७ हजार २३ अॅक्टिव्ह केसेस आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात १७ हजार १४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत एकूण ११ लाख ७९ हजार ७२६ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ८०.४८ टक्के झाला आहे. आजवर तपासण्यात आलेल्या ७२ लाख ४१ हजार ३७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४ लाख ६५ हजार ९११ नमुने हे पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२ लाख ३८ हजार ३५१ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर २५ हजार ८२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यत आज घडीला २ लाख ४७ हजार २३ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. राज्यात आज १२ हजार २५८ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या १४ लाख ६५ हजार ९११ झाली आहे.