महाराष्ट्रात १५ हजार ५९१ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासात ४२४ मृत्यूंची नोंद झाली आहे. मागील २४ तासांमध्ये १३ हजार २९४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची एकूण संख्या १४ लाख १६ हजार ५१३ इतकी झाली आहे. तर आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन एकूण ३७ हजार ४८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण ११ लाख १७ हजार ७२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात २ लाख ६० हजार ८७६ अॅक्टिव्ह केसेस आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

१३ हजार २९४ रुग्णांना मागील चोवीस तासांमध्ये डिस्चार्ज मिळाला आहे. आत्तापर्यंत राज्यातल्या ११ लाख १७ हजार ७२० रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. आत्तापर्यंत ६९ लाख ६० हजार २०३ नमुन्यांपैकी १४ लाख १६ हजार ५१३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात २१ लाख ९४ हजार ३४७ लोक होम क्वारंटाइन आहेत तर २९ हजार ५१ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. अशीही माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

आज राज्यात १५ हजार ५९१ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या १४ लाख १६ हजार ५१३ इतकी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यात ४२४ मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी २७२ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर ६५ मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित ८७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीतले आहेत अशीही माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.