23 November 2020

News Flash

दिलासा! महाराष्ट्रात २४ तासांमध्ये ३२ हजारपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त

आत्तापर्यंत राज्यात ९ लाखांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रात २४ तासांमध्ये ३२ हजार ०७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ९ लाख १६ हजार ३४८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मागील २४ तासांमध्ये १५ हजार ७३८ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या आता १२ लाख २४ हजार ३८० इतकी झाली आहे. यापैकी ९ लाख १६ हजार ३४८ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. मागील २४ तासांमध्ये ३४४ करोना मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ३३ हजार १५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने माहिती दिली आहे.

३२ हजार ७ रुग्णांना मागील २४ तासांमध्ये डिस्चार्ज मिळाल्याने महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ७४.८४ टक्के झाला आहे. आजवर तपासण्यात आलेल्या ५९ लाख १२ हजार २५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १२ लाख २४ हजार ३८० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८ लाख ५८ हजार ९२४ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३५ हजार ५१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. मागील २४ तासांमध्ये नोंद झालेल्या ३४४ मृत्यूंपैकी २०० मृत्यू मागील ४८ तासांमधले आहेत. तर ८१ मृत्यू हे मागील आठवड्यांमधले आहेत. उर्वरित ६३ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालवाधीतले आहेत. असंही आरोग्य विभागाने त्यांच्या पत्रकात स्पष्ट केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 8:53 pm

Web Title: maharashtra reports 15738 new covid 19 cases 32007 discharges and 344 deaths in the last 24 hours scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 ‘पायलच्या आरोपांची दखल घेत मुंबई पोलिसांनी त्वरित अनुरागला अटक करायला पाहिजे होते’
2 राज ठाकरेंनी रो-रो बोट प्रवासात दंड भरल्याचं वृत्त चुकीचं, मनसेचं स्पष्टीकरण
3 “आई जेवू घालेना आणि बाप भीक मागू देईना अशी ठाकरे सरकारला वागणूक,” अमोल कोल्हेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Just Now!
X