News Flash

Coronavirus – राज्यात आज १५ हजार ८१७ करोनाबाधित वाढले, ५६ रूग्णांचा मृत्यू

दिवसभरात ११ हजार ३४४ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत.

संग्रहीत

राज्यातील करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. तर, काही ठिकाणी लॉकडाउन देखील घोषित करण्यात आला आहे. करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा लॉकाडाउन लागतो की काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. राज्यातील प्रमुख शहरांसह अन्य शहरांमध्य दरोरज मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत. तर, आज दिवसभरात राज्यात १५ हजार ८१७ नवीन करोनाबाधित वाढले आहेत. तर, ५६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.३१ टक्के एवढा आहे. आजपर्यंत राज्यात ५२ हजार ७२३ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यात आज रोजी एकूण १,१०,४८५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

तर, आज ११,३४४ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २१,१७,७४४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९२.७९ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७३,१०,५८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,८२,१९१ (१३.१८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,४२,६९३ व्यक्ती गृहविलगीकरणा मध्ये आहेत. तर ४ हजार ८८४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 8:30 pm

Web Title: maharashtra reports 15817 new covid19 cases 11344 discharges and 56 deaths in last 24 hours msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 गुप्तचर यंत्रणेचा अधिकारी असल्याचे सांगून तोतयागिरी करणाऱ्यास अटक
2 …पाताळ सोडा, शरजील पुण्यात येऊन गेला हे मुख्यमंत्र्यांना माहिती नव्हतं का? – शेलार
3 नंदा खरे यांच्या ‘उद्या’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
Just Now!
X