27 October 2020

News Flash

महाराष्ट्रात एकूण ११ लाखांपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त, रिकव्हरी रेट ७८ टक्क्यांवर

मागील २४ तासांमध्ये ३९४ मृत्यूंची नोंद

महाराष्ट्रात मागील २४ तासांणध्ये १६ हजार १०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजवर एकूण ११ लाख ४ हजार ४२६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ७८.८४ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात मागील चोवीस तासांमध्ये १६ हजार ४७६ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर चोवीस तासांमध्ये ३९४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा २.६५ टक्के इतका आहे.

आजवर तपासण्यात आलेल्या ६८ लाख ७५ हजार ४५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४ लाख ९२२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात २१ लाख ७४ हजार ६५१ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर २८ हजार ७२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. सध्याच्या घडीला राज्यात २ लाख ५९ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज महाराष्ट्रात १६ हजार ४७६ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या १४ लाख ९२२ इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या ३९४ मृत्यूंपैकी २२९ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर १०३ मृत्यू हे मागी आठवड्यातले आहेत. तर उर्वरित ६२ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीतले आहेत. अशीही माहितीही महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2020 8:26 pm

Web Title: maharashtra reports 16 476 new covid19 cases 394 deaths and 16104 discharges today scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 हाथरसमधली घटना पाशवी! महाराष्ट्राला जाब विचारणारे आज गप्प का?- राज ठाकरे
2 “आतापर्यंतचा सर्वाधिक संसर्ग दर सप्टेंबर महिन्यात, आता तरी चाचण्या वाढवा”
3 पालघर: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर हॉटेल मालकाला लुटणारे जेरबंद
Just Now!
X