14 August 2020

News Flash

महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ५ हजार ३१८ नवे करोना रुग्ण, १६७ मृत्यू

गेल्या २४ तासांमध्ये १६७ मृत्यूंची नोंद

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ५ हजार ३१८ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर १६७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात जे १६७ मृत्यू गेल्या चोवीस तासात नोंदवले गेले त्यातले ८६ मृत्यू मागील ४८ तासांमधले आहेत. तर ८१ मृत्यू मागील कालावधीतले आहेत. राज्यातील मृत्यूदर ४.५७ टक्के इतका आहे. मागील २४ तासात ४४३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत ८४ हजार २४५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजे रिकव्हरी रेट ५२.९४ टक्के इतके झाले आहे. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ८ लाख ९६ हजार ८७४ नमुन्यांपैकी १ लाख ५९ हजार १३३ नमुने पॉझिटिव्ह आलेत.

सध्या राज्यात ६७ हजार ६०० रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. राज्यात ५ लाख ६५ हजार १६१ लोक होम क्वारंटाइन आहेत आणि ३६ हजार ९२५ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

मुंबईत १४६० नवे करोना रुग्ण

मुंबईत करोनाचे नवे १४६० रुग्ण मागील २४ तासांमध्ये आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये मुंबईत ४१ मृत्यूंची नोंद झाली आहेत. या नव्या संख्येसह मुंबईतल्या करोनाग्रस्तांची एकूण संख्या ही ७३ हजार ७४७ झाली आहे. तर आत्तापर्यंत ४ हजार २८२ रुग्णांचा मुंबईत करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला मुंबईत २७ हजार १३४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 8:49 pm

Web Title: maharashtra reports 167 deaths and 5318 new covid19 positive cases scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 मंदिरात चोऱ्या करणारा अट्टल चोरटा कोल्हापूर पोलिसांनी पकडला
2 अल्पवयीन मुलाला पळवून नेत लैंगिक अत्याचार करणाऱ्या महिलेवर ‘पॉस्को’ अंतर्गत गुन्हा दाखल
3 १९६२ चं चीन युद्ध विसरु नका, शरद पवार यांचा राहुल गांधींना सल्ला!
Just Now!
X