महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये १९ हजार १६४ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. या रुग्णसंख्येमुळे सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील करोना रुग्णांची एकूण संख्या १२ लाख ८२ हजार ९६३ इतकी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये ४५९ मृत्यूंची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ३४ हजार ३४५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील २४ तासांमध्ये १७ हजार १८४ रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ९ लाख ७३ हजार २१४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रात २ लाख ७४ हजार ९९३ अॅक्टिव्ह केसेस आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात आज १७ हजार १८४ रुग्ण मागील २४ तासांमध्ये बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ७५.७६ टक्के इतके झाले आहे. आजवर तपासण्यात आलेल्या ६१ लाख ९० हजार ३८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १२ लाख ८२ हजार ९६३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात १८ लाख ८३ हजार ९१२ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३३ हजार ४१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

मागील २४ तासांमध्ये नोंद झालेल्या ४५९ मृत्यूंपैकी २५६ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर १२५ मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित ७८ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधी पूर्वीचे आहेत. अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.