News Flash

महाराष्ट्रात ४ हजार ८७८ नवे करोना रुग्ण, २४५ मृत्यू

करोनाग्रस्तांच्या संख्येची वाटचाल २ लाखांच्या दिशेने

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ४ हजार ८७८ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. २४ तासांमध्ये ज्या २४५ मृत्यूंची नोंद झाली त्यातले ९५ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर १५० मृत्यू हे मागील काळातील आहेत. आज जी करोना बाधितांची संख्या समोर आली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या आता १ लाख ७४ हजार ७६१ इतकी झाली आहे. एकूण केसेसपैकी ७५ हजार ९७९ केसेस या अॅक्टिव्ह आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

मागील २४ तासात १९५१ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून ते बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ९० हजार ९११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान मागील २४ तासांमध्ये ज्या २४५ मृ्त्यूंची नोंद झाली आहे त्यातले ९५ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत तर इतर १५० मृत्यू हे मागील काळातील आहेत. महाराष्ट्रातील करोना ग्रस्तांचा मृत्यू दर हा ४.४९ टक्के इतका आहे. ९ लाख ६६ हजार ७२३ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ज्यापैकी १ लाख ७४ हजार ७६१ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसंच राज्यात सध्या ५ लाख ७८ हजार ३३ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर ३८ हजार ८६६ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 8:36 pm

Web Title: maharashtra reports 245 deaths and 4878 new covid19 positive cases today scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सत्तेत आल्यापासून शिवसेनेच्या संवेदना गोठल्या-प्रवीण दरेकर
2 वरोरा व मुल येथील उपजिल्हा रुग्णालयाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
3 तुकाराम मुंढे यांनी बळकावलं सीईओ पद; नितीन गडकरींची केंद्रात लेखी तक्रार
Just Now!
X