News Flash

महाराष्ट्रात दिवसभरात ४ हजारांपेक्षा जास्त करोना रुग्णांना डिस्चार्ज

मागील २४ तासांमध्ये ५० मृत्यूंची नोंद

महाराष्ट्रात आज दिवसभरात ४ हजार ५०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण १८ लाख १४ हजार ४४९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९४.४ टक्के इतका झाला आहे. आज राज्यात २ हजार ४९८ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात आज ५० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा २.५७ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २५ लाख ४३ हजार ७७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख २२ हजार ४८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ४ लाख ५२ हजार ५३५ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३ हजार १३८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ५७ हजार १५९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात २ हजार ४९८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १९ लाख २२ हजार ४८ झाली आहे.

आज नोंद झालेल्या ५० मृत्यूंपैकी २२ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत. तर पाच मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २३ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. अशीही माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 8:57 pm

Web Title: maharashtra reports 2498 new covid19 cases 4501 discharges and 50 deaths today scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 नव्या वर्षाचे स्वागत करा, करोनाचे नाही!
2 पंढरपूर मंगळवेढ्यातून पार्थ पवारांच्या उमेदवारीच्या प्रश्नावर अजित पवार म्हणतात…
3 “कंगनाचं ऑफिस बुलडोझरने पाडणं हा मर्दपणा होता का?”
Just Now!
X