राज्यातील करोना संसर्ग अद्यापही सुरूच आहे. मात्र, करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज मोठी भर पडत असल्याचे दिसत आहे. आज दिवसभरात ३ हजार ६९४ जणांना करोनावर मात केली आहे. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.२२ टक्के आहे. आतापर्यंत राज्यात १९ लाख १० हजार ५२१ जणांनी करोनावर मात केली आहे.

याशिवाय आज दिवसभरात राज्यात २ हजार ६९७ नवे कोरनाबाधित रुग्ण आढळले असून, ५६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या २० लाख ६ हजार ३५४ वर पोहचली आहे. याशिवाय राज्यात ४३ हजार ८७० अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर, ५० हजार ७४० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४१,४५,८२९ नमुन्यांपैकी २० लाख ६ हजार ३५४ (१४.१८टक्के) नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत.सध्या राज्यात २ लाख १३ हजार ६७८ जण गृहविलगीकरणात असून, १ हजार ९९३ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात १७९ करोनाबाधित –

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १७९ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, ११९ जण करोनामुक्त झाले आहेत. तर, पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ९९ हजार ४११ वर पोहचली आहे. यापैकी ९६ हजार ७० जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६५६ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.