06 March 2021

News Flash

Coronavirus- राज्यात दिवसभरात २ हजा ७५२ नवे करोनाबाधित, ४५ रुग्णांचा मृत्यू

१ हजार ७४३ जणांनी केली करोनावर मात

संग्रहीत

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरूच आहे. आज दिवसभरात राज्यात २ हजार ७५२ नवे करोनाबाधित आढळले असून, ४५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याशिवाय १ हजार ७४३ जण करोनामुक्त झाल्याने, त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २० लाख ९ हजार १०६ वर पोहचली आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ४४ हजार ८३१ असून, १९ लाख १२ हजार २६४ जण आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. तर, ५० हजार ७८५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, करोनावरील लस घेण्यात कुठलाही धोका नाही. कोविड प्रतिबंधक लशींची क्षमता व सुरक्षा चांगली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातील आरोग्य सेवकांशी संवाद साधताना स्पष्ट केलेले आहे. लशीबाबत पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी आवाहन देखील केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ जानेवारीपासून तीन कोटी आरोग्य कर्मचारी व आघाडीच्या कार्यकर्त्यांना लस देण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात केली होती.

पुण्यात दिवसभरात २०८ नवे करोनाबाधित, तिघांचा मृत्यू  –
पुणे शहरात दिवसभरात २०८ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या १ लाख ८४ हजार ६८२ वर पोहचली आहे. आतापर्यंत ४ हजार ७३८ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, २२९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. आजअखेर १ लाख ७७ हजार ८९३ जण करोनामुक्त झाले आहेत.

तर, ब्रिटनमध्ये गेल्या वर्षीच्या अखेरीस आढळून आलेला करोनाचा उत्परिवर्तीत विषाणू जास्त घातक असून तसे पुरावे मिळाले असल्याची माहिती पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिली आहे.

नवीन विषाणूच्या धोक्यांबाबत माहिती देणाऱ्या सल्लागार गटाने दिलेल्या तपशिलाच्या आधारे जॉन्सन यांनी सांगितले की, करोनाचा नवा प्रकार जास्तच घातक आहे. असे असले तरी फायझर-बायोएनटेक व ऑक्सफर्ड- अ‍ॅस्ट्राझेनेका यांच्या लशी त्यावर परिणामकारक आहेत. हा विषाणू वेगाने पसरणारा असून आता त्याचे पुरावे मिळाले आहेत. हा विषाणू पहिल्यांदा लंडन व आग्नेय इंग्लंड भागात सापडला होता, त्याचा मृत्युदर अधिक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2021 7:56 pm

Web Title: maharashtra reports 2752 new covid19 cases 1743 discharges and 45 deaths today msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 आम्ही देखील याच देशाचे आहोत, आमचीही जनगणना करा…- पंकजा मुंडे
2 इतक्यात तरी शरद पवार करोना प्रतिबंधक लसीचा डोस घेणार नाहीत, कारण…
3 ओबीसी समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल, तर … – विजय वडेट्टीवार
Just Now!
X