News Flash

दिलासादायक – राज्यात दिवसभरात १० हजार ३६२ जणांची करोनावर मात

आतापर्यंत राज्यात १८ लाख ४७ हजार ३६१ जण झाले करोनातून बरे

संग्रहीत

राज्यातील करोनाचा संसर्ग अद्याप थांबलेला नसताना, आज करोनाच्या नव्या स्ट्रेनचे आठ रुग्ण राज्यात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मात्र दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात राज्यात १० हजार ३६२ जणांनी करोनावर मात केली. तर, २ हजार ७६५ नवे करोनाबाधित आढळले. आतापर्यंत राज्यात १८ लाख ४७ हजार ३६१ जण करोनातून बरे झाले आहेत. राज्यात एकीकडे दररोज करोनाचे नवे रुग्ण वाढत असताना, दुसरीकडे करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १९ लाख ४७ हजार ११ झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ९४.८८ टक्के आहे.

आज दिवसभरात राज्यात करोनामुळे २९ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात एकूण ४९ हजार ६९५ जण करोनामुळे दगावले आहेत. तर, सद्यस्थितीस राज्यात ४८ हजार ८०१ अॅक्टिव्ह केसेस आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३०,४,८७६ नमुन्यांपैकी १९ लाख ४७ हजार ११ (१४.९७ टक्के) नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात २ लाख ४१ हजार ७२८ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, ३ हजार ७८ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

महाराष्ट्रात आढळले करोनाच्या नव्या स्ट्रेनचे आठ रुग्ण

ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील आठ प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील ५, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

करोनाच्या नव्या स्ट्रेनचा फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्राकडे करणार ‘ही’ महत्त्वाची मागणी

तर, ब्रिटनमधील नव्या करोना विषाणूमुळे राज्यात अधिक दक्षता घेतली जात असली, तरी परदेशातून अन्य राज्यात उतरून तेथून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रवाशांचा ओघ लक्षात घेता अशा प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळांवरच क्वारंटाईन करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार आहे. आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना लसीकरणाचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी यासंदर्भात मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2021 9:33 pm

Web Title: maharashtra reports 2765 new covid19 cases 10362 discharges and 29 deaths today msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 करोनाच्या नव्या स्ट्रेनचा फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्राकडे करणार ‘ही’ महत्त्वाची मागणी
2 महाराष्ट्रात आढळले करोनाच्या नव्या स्ट्रेनचे आठ रुग्ण
3 “औरंगाबाद नाही, तर पुण्याचं नामकरण संभाजीनगर करावं”; प्रकाश आंबेडकरांनी दिला इतिहासाचा दाखला
Just Now!
X