राज्यातील करोनाचा संसर्ग मागील काही दिवसांपासून मोठ्याप्रमाणावर वाढताना दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या व करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. करोनातून बरे होणाऱ्यांच्या तुलनेत नवे करोनाबाधित हे अधिकच आढळून येत आहेत. आज(मंगळवार) राज्यात ३ हजार ३६५ नवे करोनाबाधित रुग्ण वाढले असून, ३ हजार १०५ जण करोनातून बरे झाले. याचबरोबर दिवसभरात २३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २० लाख ६७ हजार ६४३ वर पोहचली आहे. आतापर्यंत एकूण १९ लाख ७८ हजार ७०८ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता (रिकव्हरी रेट) ९५.७ टक्के झाले आहे. तर, राज्यात एकूण ३६ हजार २०१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत राज्यात ५१ हजार ५५२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. एएनआयने ही माहिती दिली आहे.

 Maharashtra reports 3,365 new COVID-19 cases, 3,105 discharges, and 23 deaths in the last 24 hours, as per State Health Department

राज्यातील करोनाचा संसर्ग मागील काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे. काल एकाच दिवसात चार हजारापेक्षा अधिक नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामुळे प्रशासन काही कठोर पावलं उचलण्याच्या विचारात असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज(सोमवार) पत्रकारपरिषदेत बोलताना तसा सूचक इशारा दिला व नागिरकांनी मानसिकता तयार ठेवावी, असं देखील त्यांनी सांगितलं. तसेच, उद्या(मंगळवार) या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांसोबत चर्चा करणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली.

Coronavirus -“…कदाचित कठोर निर्णय घ्यावे लागतील, मानसिकता तयार ठेवा”

“जगातील अनेक देशांमध्ये कोरनाची दुसरी लाट आल्यानंतर त्यांना लॉकडाउन करावं लागलं. आपल्यातील अनेकांना याबाबत गंभीरताच राहिलेली नाही, हे खरोखरच खूप काळजीचं आहे. या पार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्र्यांची सर्वांसोबत चर्चा होणार आहे. त्यानंतर काही कठोर निर्णय कदाचित घ्यावे लागतील. त्याबद्दलची मानसिकता नागरिकांनी तयार ठेवावी.” असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  राज्यातील जनतेला दिला आहे.