29 November 2020

News Flash

महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट ८९ टक्के, दिवसभरात ९ हजार ९०५ रुग्ण करोनामुक्त

मागील २४ तासांमध्ये ८४ मृत्यूंची नोंद

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्रात आज दिवसभरात ९ हजार ९०५ करोना रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची एकूण संख्या १४ लाख ७० हजार ६६० इतकी झाली आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट आता ८९.२ टक्के इतका झाला आहे. आज राज्यात ३ हजार ६४५ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात आज ८४ करोना बाधित मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ८६ लाख ४५ हजार १९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ४८ हजार ६६५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५ लाख ३० हजार ९०० लोक होमक्वारंटाइन आहेत. तर १३ हजार ६९० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात सध्या १ लाख ३४ हजार १३७ रुग्ण अॅक्टिव्ह केसेस आहेत. आज राज्यात ३ हजार ६४५ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६ लाख ४८ हजार ६६५ इतकी झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2020 8:57 pm

Web Title: maharashtra reports 3645 new covid19 cases 9905 recoveries and 84 deaths scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 “नारायण राणेंची वैद्यकीय तपासणी करायला हवी”
2 मजुरांचा ऊस उत्पादक झाला पाहिजे तेव्हाच खरे समाधान मिळेल – धनंजय मुंडे
3 आत्मदहन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचा इचलकरंजीत मृत्यू