News Flash

Coronavirus : राज्यात आज ६१ हजार ६०७ रूग्ण करोनामुक्त; ३७ हजार २३६ नवीन करोनाबाधित

दिवसभरात ५४९ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद

संग्रहीत

राज्यात एकीकडे करोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. तर, दुसरीकडे मोठ्यासंख्येने रूग्ण करोनामुक्त देखील होताना दिसत आहे. दोन दिवसांपासून दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे दिलासादायक चित्र पाहायाला मिळत आहे. शिवाय, राज्यातील रिकव्हरी रेट देखील वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात ६१ हजार ६०७ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, ३७ हजार २३६ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय ५४९ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ४४,६९,४२५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८६.९७% एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत ७६ हजार ३९८ रूग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,९६,३१,१२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५१,३८,९७३ (१७.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३६,७०,३२० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,६६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५,९०,८१८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

पुण्यात आज दिवसभरात ४ हजार १० रूग्ण करोनामुक्त –
पुणे शहरात आज दिवसभरात १ हजार १६५ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. तर, ४ हजार १० रूग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. याशिवाय, ५१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.याचबरोबर एकूण बाधितांची संख्या ४ लाख ४७ हजार ७२९ इतकी झाली आहे. आजअखेर ७ हजार ४०९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४ लाख ९ हजार ४८४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 10:05 pm

Web Title: maharashtra reports 37236 new positive covid 19 cases 549 deaths and 61607 recoveries in the last 24 hours msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 करोनाने निराधार झालेल्या बालकांना आता शासनाचा आधार!
2 नितीन गडकरींच्या हस्तक्षेपामुळे रूग्णालायस अतिरिक्त खाटांच्या परवानगीसह वैद्यकीय साहित्याची मदत
3 “ममता बॅनर्जींची तुलना आहिल्यादेवी होळकरांशी, इथेच संजय राऊतांची वैचारिक पातळी लक्षात आली”
Just Now!
X