राज्यातील करोना संसर्ग अद्यापही वाढतच आहे. आज दिवसभरात राज्यात ३ हजार ७२९ नवे करोनाबाधित आढळले व ७२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. तर, ३ हजार ३५० जण करोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १९ लाख ५८ हजार २८२ वर पोहचली आहे. तर, राज्याचा रिकव्हरी रेट ९४.७८ टक्के आहे.
Maharashtra reports 3,729 new #COVID19 cases, 3,350 discharges, and 72 deaths today, as per State Health Department
Total cases: 19,58,282
Total recoveries: 18,56,109
Total active cases: 51,111
Total Deaths: 49,897 pic.twitter.com/UrzymDFH2j
— ANI (@ANI) January 7, 2021
सध्या राज्यात ५१ हजार १११ अॅक्टिव्ह केसेस असून, १८ लाख ५६ हजार १०९ जण आतापर्यंत करोनातून बरे झाले आहेत. याशिवाय, ४९ हजार ८९७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू देखील झालेला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिलं आहे.
आजपर्यंत करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात तपासण्यात आलेल्या १,३१,९९,२०१ नमुन्यांपैकी १९ लाख ५८ हजार २८२ (१४.८४टक्के)नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात २ लाख ७० हजार २१७ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, २ हजार ८२४ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
पुणे ठरणार भारतातील करोना लसीकरणाचा केंद्रबिंदू
दरम्यान, करोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये उद्या दुसरा ड्राय पार पडणार आहे. यासाठी आज किंवा उद्या लस पोहचवण्याचे काम केले जाणार आहे. सरकारकडून प्रवासी विमानांना लसींची वाहतूक करण्यास परवानगी दिली गेली आहे. तर, देशभरात लस वितरणासाठी पुणे हे मध्यवर्ती केंद्र असणार आहे. पुण्यातून संपूर्ण देशभरात लसींचा पुरवठा केला जाणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 7, 2021 9:12 pm