महाराष्ट्रात दिवसभरात करोनाचे ३ हजार ८३७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ८० मृत्यूंची नोंद झाली आहे. तर मागील २४ तासांमध्ये ४ हजार १९६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची एकूण संख्या १८ लाख २३ हजार ८९६ इतकी झाली आहे. तर आजपर्यंत एकूण १६ लाख ८५ हजार १२२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आज घडीला महाराष्ट्रात ९० हजार ५५७ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर करोनाची बाधा होऊन आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकूण ४७ हजार १५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
Maharashtra reports 3,837 new #COVID19 cases, 4,196 recoveries/discharges, & 80 deaths in the last 24 hours, as per State Health Department
Total cases: 18,23,896
Total recoveries: 16,85,122
Active cases: 90,557
Death toll: 47,151 pic.twitter.com/GUM7tYn7Ik
— ANI (@ANI) November 30, 2020
महाराष्ट्रात आत्तापर्यंत १६ लाख ८५ हजार १२२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजे रिकव्हरी रेट हा ९२.३९ टक्के इतका झाला आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा २.५९ टक्के आहे.
आजवर तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या १ कोटी ८ लाख ५६ हजार ३८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख २३ हजार ८९६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज घडीला राज्यात ५ लाख ३५ हजार ५३० व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ६ हजार ३५४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. आज घडीला राज्यात ९० हजार ५५७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 30, 2020 8:05 pm