03 March 2021

News Flash

दिलासा! महाराष्ट्रातील करोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ९३ टक्क्यांच्याही पुढे

महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण १७ लाखांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज

संग्रहीत

महाराष्ट्रात आज ६ हजार ३६५ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत १७ लाख ३७ हजार ८० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ९३.४२ टक्के इतका झाला आहे. आज राज्यात ४ हजा २६ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ५३ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा २.५७ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १३ लाख ७७ हजार ७४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ५९ हजार ३६७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात ५ लाखात ४८ हजार ९६१ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर ५ हजार ६१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ७३ हजार ३७४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज राज्यात ४ हजार २६ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या १८ लाख ५९ हजार ३६७ इतकी झाली आहे अशीही माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ५३ मृत्यूंची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत करोनामुळे राज्यात ४७ हजार ८२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 9:51 pm

Web Title: maharashtra reports 4026 new covid19 cases 6365 discharges and 53 deaths today scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 डिसले गुरुजींमुळे महाराष्ट्राची मान जगात उंचावली-राज ठाकरे
2 जात व्यवस्था संपवा, आम्ही आरक्षण सोडतो – रामदास आठवले
3 आजोबांसाठी नातू मैदानात ! पवारांच्या पत्रावरुन टीका करणाऱ्या भाजपाला सडेतोड प्रत्युत्तर
Just Now!
X