राज्यातील करोना संसर्ग अत्यंत झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधित आढळत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कडक निर्बंध लागू केले जात आहेत. अनेक शहरांत तर लॉकडाउन देखील सुरू झाले आहे. दरम्यान आज दिवसभरात ४० हजार ४१४ नवीन करोनाबाधित आढळले असून, १०८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, १७ हजार ८७४ जण करोनातून बरे झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत २३,३२,४५३ जण करोनातून बरे झाले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.९५ टक्के आहे. तर, आतापर्यंत ५४ हजार १८१ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यातील मृत्यूदर २ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९३,५८,३४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २७,१३,८७५ (१४.०२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात १५,५६,४७६ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत. तर १५ हजार ८५२ व्यक्ती संस्थात्मक विलीगकरणात आहेत. राज्यात सध्या ३ लाख २५ हजार ९०१ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.