राज्यात आज दिवसभरात ४ हजार २५९ नवे करोनाबाधित आढळले, तर ८० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. याशिवाय ३ हजार ९४९ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १८ लाख ७६ हजार ६९९ वर पोहचली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ९३.४६ टक्के आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून ही माहिती मिळाली आहे.

सध्या राज्यात ७३ हजार ५४२ अॅक्टिव्ह केसेस असून, १७ लाख ५३ हजार ९२२ जण करोनामुक्त झाले आहेत. याशिवाय आतापर्यंत राज्यात ४८ हजार १३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद देखील झाली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १६ लाख ३८ हजार ३३६ नमुन्यांपैकी १८ लाख ७६ हजार ६९९(१६.१३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख २५ हजार ६२३ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४ हजार ५०० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

…तर पुण्याहून पोलीस संरक्षणात येणार करोना प्रतिबंधक लसीचे डोस

दरम्यान, करोना व्हायरसवर मात करण्यासाठी लस अखेर दृष्टीपथात आली आहे. आतापर्यंत जगभरात सहाकोटी पेक्षा जास्त नागरिकांना या व्हायरसची लागण झाली आहे. पंधरा लाखापेक्षा जास्त नागरिकांनी या व्हायरसमुळे प्राण गमावले आहेत. जानेवारीपर्यंत दोन आणि त्यानंतर एप्रिलपर्यंत चार लसी वापरासाठी उपलब्ध होतील, अशी सरकारला अपेक्षा आहे.

अमेरिका : २४ तासांत करोनामुळे ३ हजार मृत्यू; फायझर लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी

तसेच, ब्रिटननंतर आता अमेरिकेनंही अमेरिकन कंपनी फायझर आणि जर्मन फार्मा कंपनी बायोएनटेकद्वारे विकसित करण्यात येत असलेल्या करोना लसीच्या आपात्कालिन वापरास परवानगी दिली आहे. सुरूवातीपासूनच अमेरिकेला करोनाचा सर्वाधिक फटका बसल्याचं दिसत आहे. जॉन हापकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत १५.५ दशलक्ष लोकांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. तर त्यांच्यापैकी आतापर्यंत २ लाख ९२ हजार जणांनी आपले प्राण गमावले आहेत.