04 March 2021

News Flash

Coronavirus : राज्यात २४ तासांत ४० मृत्यू, ४ हजार ७८७ करोनाबाधित वाढले

एकूण करोनाबाधितांची संख्या २० लाख ७६ हजार ९३ वर

संग्रहीत

राज्यातील करोना संसर्ग आता पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने दररोज आढळणाऱ्या नव्या करोनाबाधितांच्या संख्येत वाढ सुरू आहे. यामुळे आता राज्यात पुन्हा लॉकडाउन लागू होतो की काय? अशी भीती देखील सर्वसामान्यांच्या मनात आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यभरात ४ हजार ७८७ नवे करोनाबाधितवाढले असून, ४० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर ३ हजार ८५३ जण करोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देखील मिळाला आहे.

राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २० लाख ७६ हजार ९३ वर पोहचली आहे. आतापर्यंत १९ लाख ८५ हजार २६१ जण करोनातून बरे झाले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ३८ हजार १३ असून, आजपर्यंत करोनामुळे ५१ हजार ६३१ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिलं आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.६२ टक्के आहे.  सध्या राज्यात १ लाख ९५ हजार ७०४ जण गृह विलगीकरणात असुन, १ हजार ६६४ जण संस्थात्कम विलगीकरणात आहेत.

नियम पाळा, पुन्हा टाळेबंदी टाळा!

राज्यात पुन्हा टाळेबंदी लागू करण्याची वेळ येऊ नये, यासाठी गर्दी टाळणे, मुखपट्टीचा वापर करणे, समारंभ साधेपणाने साजरे करणे आदी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जनतेला केले. निर्बंध शिथिल करताना लागू असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा आदेशही त्यांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 8:23 pm

Web Title: maharashtra reports 4787 new covid 19 cases 3853 discharges and 40 deaths in the last 24 hours msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 वनमंत्री संजय राठोडबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
2 दुर्गम आदिवासी भागातील डॉक्टरांना मंजूर मानधन देण्यास सरकारची सहा महिने टाळाटाळ!
3 “…तेव्हा इंधन दरवाढीवर ट्विट करणारे अमिताभ-अक्षयकुमार आता गप्प का?”
Just Now!
X