16 January 2021

News Flash

महाराष्ट्रात दिवसभरात ११ हजार ६० रुग्ण बरे, रिकव्हरी रेट ९१ टक्क्यांवर

मागील २४ तासांमध्ये १६१ मृत्यूंची नोंद

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्रात आज दिवसभरात ११ हजार ६० करोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आत्तापर्यंत एकूण १५ लाख ६२ हजार ३४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९१.३५ टक्के इतका झाला आहे. आज महाराष्ट्रात ५ हजार २७ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर महाराष्ट्रात आज १६१ मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा २.६३ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तापसण्यात आलेल्या ९३ लाख १८ हजार ५४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख १० हजार ३१४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात १० लाख ५९ हजार ४९९ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर ८ हजार ८७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत . राज्यात आज घडीला १ लाख २ हजार ९९ अॅक्टिव्ह केसेस आहेत. आज राज्यात ५ हजार २७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या १७ लाख १० हजार ३१४ इतकी झाली आहे.

आज नोंद झालेल्या १६१ मृत्यूंपैकी ७३ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहे तर ३७ आठवड्यातील आहे. उर्वरित ५१ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावाधीपूर्वीचे आहेत. ५१ मृत्यू सातारा, १३ मृत्यू हे पुणे, ११ मृत्यू सोलापूर, ५ मृत्यू नांदेड, ५ मृत्यू ठाणे, ४ मृत्यू गोंदिया, ४ मृत्यू अहमदनगर, २ मृत्यू बुलढाणा, २ मृत्यू नाशिक, २ मृत्यू जळगाव, १ कोल्हापूर आणि १ सांगली असे आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहितीही दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2020 9:32 pm

Web Title: maharashtra reports 5027 new covid19 cases 161 deaths and 11060 discharges today scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 मराठा आरक्षणावर तोडगा काढा, अशोक चव्हाण यांची दिल्लीतील वकिलांशी चर्चा
2 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावांची यादी कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द; १२ जणांचा आहे समावेश
3 अन्वय नाईक प्रकरण : अर्णब गोस्वामी यांना दिलासा नाही
Just Now!
X