News Flash

Coronavirus – राज्यात दिवसभरात ५२ हजार ३१२ रूग्णांची करोनावर मात

५१ हजार ७५१ करोनाबाधित आढळले, २५८ रूग्णांचा मृत्यू

संग्रहीत

राज्यातील करोनासंसर्ग मागील काही दिवसांपासून झपाट्याचे वाढताना दिसून येत आहे. दररोज मोठ्यासंख्येन करोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडत आहे. मागील काही दिवस सातत्याने दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या ही करोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा अधिक असल्याचे समोर येत होते. मात्र आज दिवसभरात आढळलेल्या नवीन करोनाबाधितांपेक्षा करोनावर मात केलेल्यांची संख्या अधिक आढळून आली आहे. राज्यात दिवसभरात ५२ हजार ३१२ रूग्णांनी करोनावर मात केली असून, ५१ हजार ७५१ नवे करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, २५८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.६८ टक्के एवढा झाला आहे.

महाराष्ट्रासाठी भाजपा ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देणार – दरेकर

याशिवाय राज्यात आजपर्यंत एकूण २८,३४,४७३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८१.९४ एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,२३,२२,३९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३४,५८,९९६ (१५.४९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आजपर्यंत राज्यात ५८ हजार २४५ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

Coronavirus : राज्यात लसीचे १६ लाख ५८ हजार डोस शिल्लक! केशव उपाध्येंनी दिली आकडेवारी

सध्या राज्यात ३२,७५,२२४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,३९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५,६४,७४६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

पुण्यात दिवसभरात ४ हजार ८४९ करोनाबाधित वाढले, ५३ रूग्णांचा मृत्यू
पुणे शहरात दिवसभरात ४ हजार ८४९ करोनाबाधित रूग्ण आढळले असून, ५३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर एकूण करोनाबाधितांची संख्या ३ लाख ३४ हजार ५१० झाली आहे. तर, आजपर्यंत ५ हजार ८०१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज ३ हजार ८९६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजअखेर २ लाख ७५ हजार ३३३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2021 9:20 pm

Web Title: maharashtra reports 51751 new covid19 cases 52 312 recoveries and 258 deaths in the last 24 hours msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 बावधनची बगाड यात्रा गावकऱ्यांच्या अंगलट; ६१ जण आढळले करोनाबाधित
2 ५० वर्षांवरील कलाकारांसाठीच्या मासिक मानधन योजनेसंदर्भात सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे स्पष्टीकरण
3 Coronavirus : राज्यात लसीचे १६ लाख ५८ हजार डोस शिल्लक! केशव उपाध्येंनी दिली आकडेवारी
Just Now!
X