News Flash

महाराष्ट्रात दिवसभरात ८ हजारांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट ९२.७० टक्के

आत्तापर्यंत राज्यात एकूण १७ लाखांपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त

महाराष्ट्रात दिवसभरात ८ हजारांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट ९२.७० टक्के
संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रात आज दिवसभरात ८ हजार ६६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण १७ लाख ३ हजार २७४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ९२.७० टक्के इतके झाले आहे. तर आज राज्यात ५ हजार १८२ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात आज ११५ मृत्यूंची नोंद झाली आहे. तर राज्यातील मृत्यूदर हा २.५८ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १० लाख ५९ हजार प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ३७ हजार ३५८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४८ हजार १३७ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ५ हजार ९३९ संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ८५ हजार ५३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज राज्यात ५ हजार १८२ करोना रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यात करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १८ लाख ३७ हजार ३५८ इतकी झाली आहे.

दरम्यान आज नोंद झालेल्या ११५ मृत्यूंपैकी ४६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २२ मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित ४७ मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीच्या कालावधीतले आहेत. हे ४७ मृत्यू पुणे-९, परभणी-७, नाशिक-५, यवतमाळ-५, औरंगाबाद-४, अमरावती-३, पालघर-३, वर्धा-३, नागपूर-२, नांदेड-१, हिंगोली-१, रायगड-१, लातूर-१, सांगली-१ आणि सातारा-१ असे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2020 8:36 pm

Web Title: maharashtra reports 5182 new covid19 cases 8066 discharges and 115 deaths scj 81
Next Stories
1 महाराष्ट्र कधी घाबरला नाही आणि कधी घाबरणारही नाही – उद्धव ठाकरे
2 सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसलेंना ७ कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार
3 महाविकास आघाडी सरकारचं चौथं चाक म्हणजे महाराष्ट्राची जनता – मुख्यमंत्री
Just Now!
X