News Flash

दिलासादायक : राज्यात दिवसभरात ८२ हजार २६६ रूग्ण करोनामुक्त; रिकव्हरी रेट ८६.०३ टक्के

५३ हजार ६०५ नवीन करोनाबाधित आढळले असून, ८६४ रूग्णांचा मृत्यू

संग्रहीत छायाचित्र

राज्यात करोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच आहे. दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. मात्र एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत असल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात राज्यात ८२ हजार २६६ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, ५३ हजार ६०५ नवीन करोनाबाधित आढळले असून, ८६४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ४३,४७,५९२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८६.०३ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,९१,९४,३३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५०,५३,३३६ (१७.३१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३७,५०,५०२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,४५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,२८,२१३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2021 10:15 pm

Web Title: maharashtra reports 53605 new covid19 cases 82266 recoveriesin the last 24 hours msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी जेरबंद!
2 Coronavirus Crisis : केंद्रसरकार जाणूनबुजून अन्याय करतेय की, काम करता येत नाही – नवाब मलिक
3 “भाजपाने पोटदुखीचा इलाज करावा व भाजपाशासित राज्यांच्या खोट्या आकडेवारीकडे लक्ष द्यावे”
Just Now!
X