News Flash

महाराष्ट्रात आज ८ हजारांपेक्षा जास्त करोना रुग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट ९० टक्के

मागील २४ तासात १२० पेक्षा जास्त मृत्यूंची नोंद

संग्रहीत छायाचित्र

महाराष्ट्रात आज दिवसभरात ८ हजार ७२८ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १५ लाख ४० हजार ५ इतकी झाली आहे. महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट हा आता ९०.६८ टक्के इतका झाला आहे. दरम्यान आज महाराष्ट्रात ५ हजार ५०५ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह झाल्याची माहिती समोर आली आहे. तर मागील २४ तासांमध्ये १२५ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९१ लाख ८५ हजार ८३८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ९८ हजार १९८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १३ लाख ३५ हजार ६८१ व्यक्ती होमक्वारंटाइन आहेत. तर ११ हजार ६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला एकूण १ लाख १२ हजार ९१२ अॅक्टिव्ह केसेस आहेत. आज राज्यात ५ हजार ५०५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबईचा रिकव्हरी रेट ८९ टक्के

मुंबईत मागील २४ तासांमध्ये १ हजार ७१७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आजवर मुंबईत २ लाख ३३ हजार २७८ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ८९ टक्के झाला आहे. आज घडीला मुंबईत १६ हजार ५२४ सक्रिय रुग्ण आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 8:48 pm

Web Title: maharashtra reports 5505 new covid19 cases 8728 discharges and 125 deaths scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मिळणार दिवाळीची सुट्टी; शालेय शिक्षणमंत्र्यांची घोषणा
2 विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करोनामुक्त, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
3 “पेंग्विनसारखा दिसतो तर पेंग्विनच म्हणणार आणि पप्पूसारखं काम केलं तर पप्पूच म्हणणार ना”
Just Now!
X