28 November 2020

News Flash

महाराष्ट्रात मागील २४ तासात ५ हजारांपेक्षा जास्त नवे करोना रुग्ण, १५४ मृत्यूंची नोंद

राज्यात मागील २४ तासांमध्ये १५४ मृत्यूंची नोंद

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्रात मागील २४ तासात ५ हजार ५३५ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर १५४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकूण १७ लाख ६३ हजार ५५ रुग्णांना करोनाची बाधा झाली आहे. ज्यापैकी १६ लाख ३५ हजार ९७१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर आज घडीला ७९ हजार ७३८ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर महाराष्ट्रात आजपर्यंत ४६ हजार ३५६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ९९ लाख ६५ हजार ११९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ६३ हजार ५५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज समोर आलेल्या संख्येनुसार राज्यात ५ लाख ६० हजार ८६८ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४ हजार २८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

दरम्यान मागील २४ तासांमध्ये ५ हजार ८६० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत १६ लाख ३५ हजार ९७१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ९२.७९ टक्के इतका झाला आहे.

मुंबईत ९२४ नवे रुग्ण
मुंबईत करोनाचे ९२४ नवे रुग्ण मागील २४ तासांमध्ये आढळले आहेत. तर १ हजार १९२ रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये मुंबईत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आत्तापर्यंत २ लाख ७२ हजार ४४९ रुग्णांना करोनाची बाधा झाली. त्यापैकी २ लाख ४९ हजार ९०३ रुग्णांनी करोनावर मात केली. तर आत्तापर्यंत एकूण १० हजार ६२४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आज घडीला मुंबईत ८ हजार ४७४ रुग्ण उपचार घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 8:55 pm

Web Title: maharashtra reports 5535 new covid19 cases 5860 recoveries and 154 deaths scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 मुंबईतील बांधकाम क्षेत्रासाठी यंदाच्या दिवाळी ठरली सर्वोत्कृष्ट; दोन वर्षातील सर्वाधिक घरांची विक्री
2 “ठाकरे परिवाराचा व्यवसाय आहे तरी कोणता? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे”
3 ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार : मदान
Just Now!
X